अमेरिका आणि इराण संघर्षामुळे तेलाच्या किमती भडकल्यास- कोणत्याही स्थितीला तोंड देण्याची सरकारची तयारी- धर्मेंद्र प्रधान
नवी दिल्ली: अमेरिका आणि इराण यांच्या मध्ये वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे, पण कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वार्ताहरांना सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, परराष्ट्रमंत्री एस, जयशंकर यांनी सर्व तेल उत्पादक राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली आहे. मध्यपूर्व भागांत निर्माण झालेल्या परिस्थितीचे वेगवेगळे परिमाण आहेत, त्या प्रमाणे आम्ही धोरण आखलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
सौजन्य – AIR
