मुंबई केंद्रशासित प्रदेश, विदर्भ वेगळे राज्य करण्याचा केंद्राचा डाव : प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबई: मुंबई केंद्रशासित प्रदेश, विदर्भ वेगळे राज्य आणि उर्वरित महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा केंद्राचा डाव आहे. यासाठी केंद्रातील सरकारला राज्यात राष्ट्रपती राजवट हवी असल्याचा सणसणीत आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर केला आहे. ते पुढे म्हणाले की ज्याप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीत जम्मू काश्मीरचे तुकडे केले. त्याप्रमाणे इथेही राज्याचे तीन तुकडे करण्याचा घाट घातला जात आहे. काँग्रेसला आम्ही विचारतो की तुम्ही या कटात सहभागी आहात की नाही याचा खुलासा करावा.”
विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास एक महिना सायलेंट मोड वर असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आज मोदी सरकारवर व जोडीला काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडून नव्या चर्चेला सुरवात केली आहे.
