Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी

विधानपरिषदेच्या ५ पैकी ३ जागांवर महाविकास आघाडीचा विजय

अमरावती, दि.३: विधान परिषदेच्या ३ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. काल एकूण ४ मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले होते. आज उर्वरित अमरावती पदवीधर मतदारसंघातली मतमोजणी पूर्ण होऊन थोड्या वेळापूर्वी निकाल जाहीर झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे तिथे विजयी झाले असून भाजपाचे रणजीत पाटील यांचा त्यांनी पराभव केला.

नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून, महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले असून, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी बाजी मारली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *