Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अकोला जिल्ह्यात खासगी कापूस खरेदीला झाला प्रारंभ

अकोला जिल्ह्यात खासगी कापूस खरेदीला झाला प्रारंभ

अकोला, दि. १ : अकोला जिल्ह्यात, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासगी कापूस खरेदीचा प्रारंभ काल झाला. यावेळी लिलावात मुहूर्ताच्या कापसाला ९ हजार १११ रुपये भाव मिळाला आहे. प्रथम कापूस आणणारे शेतकरी मनिष मोहन तायडे रा. पोपटखेड यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिनिंगतर्फे सुनील काळे यांनी लिलावात बोली लावून मुहूर्ताच्या कापसाला नऊ हजारांचा भाव दिला. एकंदर कापसाला लिलावात ७ हजार ६०० पासून ते ९ हजार १११ रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *