“नरेंद्र मोदींवर ७२ तासांची नव्हे तर ७२ वर्षे बंदी घातली पाहिजे” : अखिलेश यादव
लखनऊ: दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील सेरमपूर येथील प्रचार सभेत बोलताना तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार माझ्या संपर्कात आहेत तसेच ते आमदार लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे भाष्य त्यांनी केले होते. या भाष्यावरुन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
अखिलेश यादव ट्विटमध्ये म्हणतात की, ‘‘विकास विचारत आहे की, पंतप्रधानांचे लाजीरवाणे भाषण ऐकले का? सवाशे कोटी देशवासीयांचा विश्वास गमावून आता ते बंगालच्या ४० आमदारांचे तथाकथित पक्षांतराच्या अनैतिक विश्वासापर्यंत संक्षिप्त केले आहे. ही काळ्या पैशांची मानसिकता बोलत आहे. यासाठी मोदींवर ७२ तासांची नाही तर ७२ वर्षांची बंदी घातली पाहिजे.’’, अशा शब्दात अखिलेश यांनी मोदींवर टीका केली आहे.
‘विकास’ पूछ रहा है: प्रधान जी का शर्मनाक भाषण सुना क्या? “सवा सौ करोड़” देशवासियों का भरोसा खोकर अब वो बंगाल के 40 विधायकों के तथाकथित दल-बदल के अनैतिक भरोसे तक सिमट गये हैं. ये वो नहीं काले धन की मानसिकता बोल रही है.
इसके लिए उन पर 72 घंटे नहीं बल्कि 72 साल का बैन लगना चाहिए. pic.twitter.com/H504UdfWGo
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 30, 2019
अखिलेश यादव उत्तर प्रदेशातील आझमगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. अखिलेश यांच्याविरोधात भाजपने या मतदार संघातून भोजपुरी सुपरस्टार दिनेशलाल यादव याला उमेदवारी दिली आहे.
