Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भारताचा ‘हिटमॅन’ झाला ३२ वर्षाचा!

भारताचा ‘हिटमॅन’ झाला ३२ वर्षाचा!

भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माचा आज ३२ वा वाढदिवस. रोहित गुरूनाथ शर्मा याचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात झाला. त्याने वयाच्या २० व्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. सन २०१३ मध्ये त्याने भारतीय संघाचा एक सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली. त्याने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतके केली.

रोहित IPL मध्ये मुंबई इंडियन्स या संघात खेळत आहे. IPL मध्ये रोहित सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ तीन वेळेस इंडियन प्रीमियर लीगचा कप जिंकला आहे.

रोहितने १ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एक सलामीचा फलंदाज म्हणून भारताकडून सर्वात जलद ४००० धावा पूर्ण केल्या. २०१७ डिसेंबरमध्ये श्रीलंका विरुद्ध टी२० मध्ये ३५ बॉल मध्ये जलद शतक ठोकणारा तो जगात दुसरा क्रिकेटपटू ठरला. रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यामध्ये तीन द्विशतक करणारा जगातील अव्वल खेळाडू आहे.

रोहित शर्माचे विक्रम :

१) ११ ऑक्टोबर २०१५ रोजी कानपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना १५० धावांची खेळी त्याने एकट्याने केली.
२) रोहितने एकाच डावात १६ षटकार मारले होते.
३) रोहितने ५००० हजार धावांचा पल्ला १०२ डावांत पूर्ण केला. ५ हजार धावांचा टप्पा पार करणार पहिला भारतीय सलामीवीर
४) १ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० षटकार मारले.
५) एकाच एकदिवसीय सामन्यांमध्ये दीडशे धावा आणि तीन चेंडूची झेल पकडणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *