Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावं, अजित पवारांची राज ठाकरेंना ऑफर !

Ajit-n-MNS-Flag-640-Web

मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावं, अजित पवारांनी दिली राज ठाकरेंना ऑफर!

मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे, असे वक्तव्य अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले आहे. यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने मनसेला सोबत येण्याची ऑफर दिली आहे. राज ठाकरे यांच्यासह खासदार राजू शेट्टींचे मतभेदही दूर केले जातील, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करताना किंवा त्यांची नक्कल करताना आपण आजवर अनेक वेळा पाहिले आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हे चित्र बदलताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये भेटी गाठी वाढल्या आहेत. छगन भुजबळ यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी-मनसे एकत्र येत असल्याच्या चर्चाला सर्वत्र सुरूवात झाली आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करायचे असेल तर सेक्युलर विचार मानणाऱ्या सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका अजित पवारांनी यावेळी मांडली आहे राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या सोबत येण्याचं आवाहन केले आहे. आता राज ठाकरे या ऑफरला कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *