सुधारित पालक मंत्रीपदाच्या यादीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच वरचष्मा
मुंबई, दि. ४: राष्ट्रवादी कॉंग्रेस चे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फारकत घेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट यांच्या सोबतीने राज्य सरकार मध्ये सामील झालेल्या अजित पवार यांनी सत्तेत येताच उपमुख्यमंत्री पदासोबत अर्थमंत्री पद पदरात पाडून घेतले. यावेळी शिवसेना शिंदे गटातील आमदारांची कोंडी झालेली पाहायला मिळाली. नेमकी तशीच परिस्थिती सध्या उद्भवते की काय असे सध्याचे चित्र आहे. आज शिंदे-फडणवीस-पवार सरकार तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील १२ जिल्हयांसाठी नियुक्त केलेल्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पुनः एकदा अजित पवार गटाचा वरचष्मा पाहायला मिळतोय.
पुण्यातून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवार यांनी स्वतःहाची पुण्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करवून घेत पहिला धक्का खुद्द भाजपाच्या एका प्रमुख नेत्याला दिला आहे. याच सोबत कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्री दीपक केसरकर यांना धक्का देत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची पालकमंत्री पदी नियुक्ती केली आहे. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पाऊल मागे घेत आपल्या शिलेदाराला नमतं घ्यायला लावलेलं पाहायला मिळत आहे. रायगड, सातारा व नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा लढा अद्याप सुटलेला नाही.
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
भंडारा- डॉ.विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदुरबार- अनिल पाटील
