राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या पक्ष फूटीबाबत अजित पवार यांनी स्पष्ट केली आपली भूमिका
मुंबई, दि. १८: राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष फुटीचे वृत्त फेटाळून लावले. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांचे पुतणे अजित पवारही माध्यमांसमोर आले. अजित बंडखोरीच्या मुद्द्यावर ते आज थेट बोलले. यावेळी आपण जीवात जीव असेपर्यंत पक्षाचं काम करत राहणार, राष्ट्रवादीतच राहणार आहोत असे ते बोलले.
पत्रकार परिषदेत अजित म्हणाले की, राष्ट्रवादीला मजबूत करण्यासाठी मी काम करत राहीन. माध्यमांनी खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिरावून घेतला गेला आहे, त्यामुळे तो परत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना साध्या कागदावर सह्या करून घेतल्याचा आरोप फेटाळून लावला.
काळजी करु नका पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक चढउतार आले आहेत. सध्या येत असलेल्या बातम्यांमध्ये यथकिंचीतही तथ्य नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. पक्षातच राहणार आहोत बातम्यांमध्ये काही तथ्य
यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर अजित पवार यांनी केलेल्या टीकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. ते म्हणाले की, “बाहेरचा कोणीही राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वक्तव्य करू शकत नाही. राष्ट्रवादीचे स्वतःचे नेते आणि प्रवक्ते आहेत.”
