Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“निर्वाणीची भाषा कोणीही करू नये, करायची असल्यास ती घरात करा” – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज ठाकरे यांच्या इशार्‍याला प्रत्युत्तर

मुंबई, दि.५: राज्यात सर्वांनी आवाजाची मर्यादा पाळून भोंगे लावावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नियम सर्व धार्मिक स्थळांना लागू होईल आणि नियम सर्वांसाठी सारखाच असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले. धार्मिक स्थळांनी भोंग्यासाठी परवानगी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केले.

राज्यात कोणाचीही हुकुमशाही चालणार नाही. निर्वाणीची भाषा कोणीही करू नये, करायची असल्यास ती घरात करा असेही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात दिलेल्या इशाऱ्याला उत्तर देताना म्हणाले. राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम केलं असून कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. गृहमंत्र्यांनी या संदर्भात पोलिसांना सूचना दिल्या असल्याचं पवार यांनी सांगितले.

इतर मागास प्रवर्ग राजकीय आरक्षणाबाबत विरोधकांचा रडीचा डाव सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. विधिमंडळात विरोधी पक्ष सदस्यांच्या मदतीने ठराव झाले आहेत. इतर मागास प्रवर्गाला आरक्षण मिळावं ही सरकारची भूमिका आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज बैठक घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *