हवाई हल्ल्यात ४ इमारती झाल्या नेस्तनाबूत पण …
दिनांक २६ फेब्रुवारी ला पहाटे हवाई दलामार्फत करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात POK मधील जैश-ए-मोहम्मद चा तळ उध्वस्त करण्यात आला. जवळपास चार इमारती ह्या हल्ल्यात पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आल्या. SAR च्या चित्रात ते स्पष्ट दिसत आहे. ह्या हल्ल्यात ३५० दहशतवाद्यांचा खात्मा झाला अशी माध्यमात चर्चा असली तरी नेमके किती अतिरेकी मारले गेले ह्या बद्दल अजून नेमकी माहिती नसल्याचे इंडियन एक्सप्रेस ने सुरक्षा दलातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले आहे.
ते पुढे म्हणतात उपग्रहाद्वारे काढण्यात आलेली छायाचित्र अस्पष्ट आहेत कारण ढगाळ वातावरणात ती काढण्यात आली होती. त्यातच हल्ला झालेली जागा पाक लष्कराने सील केल्यामुळे अधिक माहिती मिळवण्यात गुप्तचर यंत्रणांना अडचणी येत आहेत. त्यामुळे हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा हाती लागायला काही काळ थांबावे लागू शकते.
