ऐरोली मधून संदीप नाईक यांच्या जागी गणेश नाईक लढवणार निवडणूक
नवी मुंबई: नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांचं बेलापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याचं स्वप्न जरी भंगलं असलं तरी, ऐरोली विधानसभा मतदारसंघातून ते आता पूर्ण होणार आहे.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार संदीप नाईक वडील गणेश नाईक यांच्यासाठी ही जागा सोडणार आहेत. या बाबत भाजप श्रेष्ठींशी त्यांनी चर्चा केल्याचे कळते. याच बरोबरीने त्यांनी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली.
