“अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आशिया आणि आफ्रिकेत दहशतवादाचा धोका वाढत चालला आहे” – डॉ. एस. जयशंकर
‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दहशतवादी कारवायांसाठी होणारा उपयोग’ या विषयावर ते बोलत होते. दहशतवादाचं मोठं संकट मानवतेवर आहे. आभासी खासगी यंत्रणा, आभासी चलन, सांकेतिक संदेश यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर दहशतवादासाठी केला जात आहे. यामुळे सरकार आणि संबंधित यंत्रणांसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याबद्दल जयशंकर यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.
तसंच दहशतवादी संघटना मानवविरहीत ड्रोनचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत असल्यानं सुरक्षा यंंत्रणांना धोका निर्माण झाला आहे. ड्रोनच्या मदतीनं दहशतवादी हल्ले, ड्रग्जची तस्करी केली जात असल्याकडेही जयशंकर यांनी लक्ष वेधलं. दहशतवादी संघटना ड्रोनच्या मदतीनं आफ्रिकेतील सुरक्षा बल आणि संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
