Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

मुंबई, दि. ६: अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेतली.

भुजबळ म्हणाले, अफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंदर्भातील माहिती अफगाणिस्तानला धोरणे बनविताना निश्चितच उपयुक्त ठरतील. राज्यातील विविध विकासकामांबाबत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली .

अफगाणिस्तानची मुंबईतील पहिली महिला वाणिज्यदूत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून झाकिया वर्दक यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील उद्योग-व्यापार वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे संगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *