Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती करण्यात आल्याचे जाहीर

आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती करण्यात आल्याचे जाहीर

मुंबई, ‍‍दि. १३ : पदभरती करताना सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुन:श्च बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे या विभागाची दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी दिलेली पदभरती जाहिरात तूर्त स्थगित करण्यात आली असल्याचे आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी  प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

आदिवासी विकास विभागातील ६०२ विविध रिक्त पदांकरिता २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदभरतीत जाहिरातीनुसार २३ नोव्हेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. विविध पदांकरिता उमेदवारांचे अर्जही ऑनलाईन प्राप्त झाले होते. तथापि दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) या संवर्गाचा समावेश करून त्यानुसार बिंदुनामावली अद्ययावत करून गट क संवर्गासाठी जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करण्याबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आले आहे. ही जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात आली असून, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *