अडाणी उद्योगासमुह-हिंडेनबर्ग शरद पवारांच्या भूमिकेचं रामदास आठवलेंकडून स्वागत
मुंबई, दि. ८: अदानी उद्योगासमुहा प्रकरणी संयुक्त संसदीय समितीची मागणी योग्य नाही या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचं केन्द्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केलं आहे. सर्व विरोधक संयुक्त संसदीय समितीची मागणी करत असताना पवार यांनी या भूमिकेला छेद देत ही मागणी योग्य नसल्याचं म्हटलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.
दरम्यान, अदानी उद्योग समूहा प्रकरणी संयुक्त संसदीय समिती मार्फतच चौकशी झाली पाहिजे या मागणीवर कॉंग्रेस ठाम असल्याचं, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Source – AIR
