विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्याकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी
नागपुर, दि. २६: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. हा मुद्दा आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित करत अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अब्दुल सत्तार यांनी महिला खासदारांच्या विरोधातही अपशब्द वापरलेले आहेत त्यामुळेही त्यांचा राजीनामा घेण्यात यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी असंही ते म्हणाले. या मागणीसाठी विरोधी सदस्यांनी आक्रमक होत थेट हौद्यातच धाव घेतली आणि खाली बसून जोरदार निदर्शनं केली. यावेळी राजीनामा द्या अशा घोषणा करण्यात आल्या.
आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली. यावेळी झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी ३० मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकुब करण्यात आलं.
Source – AIR
