कोविड-१९ चा रायगड जिल्हयातील पहिला बळी; खारघर येथील कोरोना पॉसिटीव्ह रिक्षाचालकाचा मृत्यू
पनवेल/नवी मुंबई: पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर भागत वास्तव्यास असलेल्या ३३ वर्षीय कोरोना पॉसिटीव्ह रुग्णाचा आज सकाळी वाशी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील व त्यातही पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेला हा पहिला रुग्ण आहे.
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त अशी टीम हा मृतदेह वाशी येथे आपल्या उपस्थितीत स्वीकारणार असल्याचे कळते. यानंतर त्या मृतदेहाला पनवेल येथे आणण्यात येऊन थेट पालिकेचे कर्मचारी त्याचे दहन करणार आहेत. काल संध्याकाळपर्यंत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पॉसिटीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या २१ होती आज यात वाढ होण्याची भीती दर्शवली जातेय. याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केले आहे की मुंबई प्रादेशिक व पुणे प्रादेशिक परिसरात लॉकडाऊन हा विशिष्ठ विभागात वाढवला जाऊ शकतो.
