कोरोनाबधित रुग्णांची संख्या गेली ७४ वर; मुंबईत आणखी एक मृत्यू
मुंबई: काल ६४ वर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७४ वर पोहोचली आहे. यात एकूण नव्या १० रुग्णांची भर पडली आहे. यातले सहा रुग्ण मुंबईतील तर चार रुग्ण पुण्यातील आहेत.
आज कोरोना बाधित एका ६३ रुग्णाचा मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण मृतांची संख्या २ तर देशातील मृतांची संख्या ६ वर गेली आहे.
