आमदार नितेश राणे चिकनचा आस्वाद घेत म्हणाले, “चिकन आणि कोरोना व्हायरस बाबतच्या अफवेत काहीच तथ्य नाही”
मुंबई: कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर लोकांनी आपल्या आहारातून चिकनला सुट्टी दिली आहे. याला कारण म्हणजे चिकनमुळे कोरोना चा प्रादुर्भाव होऊ शकतो ही ‘अफवा’. शासनानेही ही अफवा असल्याचे सांगत बिनधास्तपणे चिकन खाऊ शकता असे स्पष्ट केले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट करत चिकन चे जेवण करतानाच फोटो टाकला आहे. या सोबत ते म्हणाले आहेत की, “चिकन आणि कोरोनाबाबत असलेल्या अफवेत कोणतेच तथ्य नाही.”
गेले काही दिवस चिकन चा खपही कमी झाला असून पोल्ट्री व्यावसायिकांवर कोंबड्या स्वतःहून मारून टाकण्याची वेळ आली आहे.
Having my fav CHICKEN meal !
All these lies abt chicken n Coronavirus r not true at all! pic.twitter.com/yhCHznVK8r— Nitesh Rane (@NiteshNRane) March 15, 2020
