मुस्लिमांना आरक्षण देण्याची घोषणा ही शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी – रामदास आठवले
महाराष्ट्रात मुस्लिम समाजातल्या बांधवांना ५ टक्के शैक्षणिक आरक्षण देण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी केली गेली आहे, असं केन्द्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
अशाप्रकारे धर्मावर आधारित आरक्षणाला शिवसेनेचा पहिल्यापासून विरोध आहे, त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या विचारधारेशी तडजोड न करता महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भाजपाशी पुन्हा एकदा हातमिळवणी करावी, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं.
Credit -AIR
