Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बृहन्मुंबई पोलीस आयुक्त पदी परम बीर सिंह यांची नियुक्ती

बृहन्मुंबई पोलीस आयुक्त पदी परम बीर सिंह यांची नियुक्ती

मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदी परम बीर सिंह, भापोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे आज सेवानिवृत्त होत असल्याने होणाऱ्या रिक्त पदावर सिंह यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक असलेले परम बीर सिंह हे भारतीय पोलीस सेवेच्या सन १९८८ च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

सिंह यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस महासंचालक बिपिन के. सिंग यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *