सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
मुंबई: भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या सुमधुर गायकीचं योगदान दिलेले सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सुरेश वाडकर यांचे मराठी आणि हिंदी चित्रपटांत ८० आणि ९० च्या दशकांत अनेक गाणी गायली. मराठीतील ‘गुप-चूप गुप-चूप’ चित्रपटातील “पाहिले न मी तुला तू मला न पाहिले” हे गाणं अद्याप रसिकांच्या ओठांवर तरळते आहे. हिंदीतील सदामा चित्रपटातील गाणेही रसिकांच्या मनावर आद्यप गारुड करून आहे.
