राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्राने हटवली
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारकडून काढून टाकण्यात आली आहे. शरद पवार यांच्या दिल्ली मधील ‘६ जनपथ’ या निवासस्थानी दिल्ली पोलीस व सीआरपीएफचे अनुक्रमे ३-३ सुरक्षारक्षक होते. पण अचानक २० जानेवारी पासून ही सुरक्षा हटवण्यात आली.
सदर निवासस्थानाची सुरक्षा हटवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी दर्शवली आहे.
