येत्या १९ जानेवारीला निलांबरी जोशी येत आहेत साताऱ्यात; ‘आपण आणि सोशल मीडिया’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधायला
“तीन वर्षांची मुलं आपला आवाज व्हॉटसअॅपवर रेकॉर्ड करुन अमेरिकेतल्या आत्याला पाठवतात” असं मला दोन दिवसांपूर्वीच एकानं कौतुकानं सांगितलं.. पण वयाच्या साडेचार वर्षांपर्यंत मुलांच्या हातात एक क्षणभरही मोबाईल देऊ नये असा सल्ला मानसोपचारतज्ञ देतात. मोबाईलच्या व्यसनाचे गंभीर परिणाम सर्व वयोगटात दिसायला लागले आहेत. पण “मिलेनियल जनरेशन”वर त्याचे सर्वात जास्त घातक परिणाम होतात. .! १९ जानेवारीला रविवारी साताऱ्यात “आपण आणि सोशल मिडिया“ याच विषयावर मी मुलांशी संवाद साधणार आहे. “इग्नायटेड माईंडस” या कार्यक्रमात माझ्या भाषणानंतर काही विद्यार्थी माझी मुलाखत घेणार आहेत.. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आणि खुला आहे. सगळ्यांना आमंत्रण…!
स्थळ: युनिव्हर्सल नॉलेज स्कूल. वर्वे, सातारा. वेळ : सकाळी १०.१५ वाजता.
अधिक माहितीसाठी

