Narendra Modi Tweeter
कलम 356 चा काँग्रेसने अनेक वेळा गैरवापर केला आहे. पण मोदी संस्था नष्ट करत आहेत: पीएम,” असं ट्वीट पीएमओ इंडिया या ट्विटर अकाऊंटवरुन काल संध्याकाळी शेअर करण्यात आलं. सध्या सोशल मीडियावर या ट्विटर पोस्टची जोरदार चर्चा आहे.
Congress misuses Article 356 several times…but Modi is destroying institutions: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 7, 2019
पीएम ऑफिसच्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदी संस्था नष्ट करत आहेत, असं स्वत: नरेंद्र मोदी म्हणत असल्याचं ट्वीट पोस्ट केल्यानंतर त्या पोस्टवर अनेकांनी खोचक अशा कॉमेंट्सही केल्या आहेत.
पाच वर्षात प्रथमच मोदी खर बोलले आहेत, त्यांचं स्वागत करायला पाहिजेत, तसेच हे ट्वीट राहुल गांधी तर करत नाहीत ना, अशा शब्दांत काही जणांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
