भाजपची माघार, विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक आज होणार होती. पण तत्पूर्वीच भाजपने आपले उमेदवार किसन कथोरे यांना माघार घ्यायला लावली. महा विकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची रीती नुसार बिनविरोध निवड झाली आहे.
काल विधानसभेत महाविकास आघाडीने १६९ विरुद्ध शून्य मतांनी बहुमताचा ठराव जिंकला. यावेळी भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला तर ४ सदस्यांनी तटस्थ भूमिका स्वीकारली. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा विजय हा निश्चित होता पण आज भाजपने माघार घेतल्यामुळे त्यांच्या अध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला.
