Sadhu Indian Kumbha Mela Hindu 2
अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळा भरतो.
सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु आहे. कुंभमेळ्याच्या काळात अनेक जणं नागा साधू बनण्याची दीक्षा घेतात.
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा 10 हजार तरुणांनी नागा साधू बनण्याची दीक्षा घेतली आहे. विशेष बाब म्हणजे ज्या तरुणांनी दीक्षा घेतली ते उच्चशिक्षित आणि पदवीधर तरुण आहेत. या सर्व तरुणांनी नागा साधू बनण्याची दीक्षा मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर घेतली. स्वतःचे केस नदीला अर्पण करत तसेच ओम् नमः शिवाय’ चा जप करत हा विधी पूर्ण केला जातो.
तरुणांना आपल्या कुटुंबाचा त्याग करून सहा वर्षे कठोर तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या करताना लंगोट परिधान करावे लागते.
कुंभमेळ्यात दीक्षा घेतल्यानंतर च त्यांचा नागा साधू मध्ये समावेश होतो. नागा साधू बनण्याची तरुणांना अंत्यत कठीण तपश्चर्या करावी लागते.
