भाऊबीजेच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलिसांनी समस्त बहिणींना ही भेट भावाला द्यायला सांगितलीय
मुंबई: भाऊबीजेचं निमित्त साधून महाराष्ट्र पोलीसांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून एक रस्ते सुरक्षे संबंधी ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विट मध्ये समस्त बहिणींना आवाहन करण्यात आलं आहे की, “या भाऊबीजेला आपल्या भावाला भेट म्हणून हेल्मेट द्या. हेल्मेट तुमच्या भावाचा जीव सुरक्षित ठेवेल.”
ही भेट वस्तू तुमच्या भावाला आयुष्यभर साथ देईल. #Bhaubeej #Bhaidooj pic.twitter.com/dsGs6MG100
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) October 29, 2019
विशेषकरून महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जनजागृती करण्यासाठी ट्विटरवर असे हटके आणि कल्पक ट्विट करत असतात.
