देशाच्या सरन्यायाधीशपदी मराठी माणूस; न्यायमूर्ती शरद बोबडे १८ नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार
नवी दिल्ली: मराठी माणसासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी निवड झाली आहे. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून. त्यांनीच विधी आणि न्याय मंत्रालयाकडे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस या पदासाठी केली. यानंतर राष्ट्रपतींनी त्यांच्या स्वाक्षरी करत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. १८ नोव्हेंबर रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत.
न्यायमूर्ती शरद बोबडे हे देशाचे ४७ वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण नागपूर येथे झाले असून त्यांनी १९९८ पर्यंत ते नागपूर न्यायालयात वकिली केली.
