अभिजीत दिपके यांचं जंतर-मंतर वरचं आंदोलन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत कायम राहणार
नवी दिल्ली, दि. २४ः नीट पेपर फूटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत मागील जवळपास २६ दिवस आमरण उपोषण करत असेलल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण काल रात्री उशिरा मागे घेतलं. भाजप नेते व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक असल्याने मी माझं आमरण उपोषण मागे घेत असून विद्यार्थ्यांनी संयम ठेवून कुठेही हिंसा करू नये असं आवाहन त्यांनी केलं. त्या आधी काही वेळापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक तीन मिनिटांचा एक विडियो प्रसारित करत नीट पेपर फूटी प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी उपाययोजना करत असल्याची माहिती यावेळी पंतप्रधानांनी फ्रेंडस म्हणत तरूणांना दिली.
मध्यरात्री सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी कोकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपण शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत ठाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की सोनम वांगचूक यांचा जीव देशासाठी मौल्यवान आहे. कालच आम्हीही त्यांना पत्राद्वारे उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दिपके यांच्या स्पष्टीकरणामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली टी म्हणजे जंतर मंतरसह देशभर चालू असलेले विद्यार्थी आंदोलन येत्या काळात आणखी तीव्र होईल.
