शोलेतला ‘कालिया’ कालवश; ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन
मुंबई: मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अमीट अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते विजू खोटे यांचे आजा वयाच्या ७८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. दक्षिण मुंबईतील आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘शोले’ मध्ये साकारलेल्या ‘कालिया’ या पत्राने तर त्यांना वेगळीच ओळख मिळवून दिली जी आयुष्यभर त्यांच्या नावाशी जोडली गेली. ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपट त्यांनी साकारलेला रॉबर्ट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अशा या हरहुन्नरी कलाकाराने ३०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले होते. आज सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
