शिवसेना पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांची उद्या मुंबईत महत्वाची बैठक; होऊ शकते युतीबाबत महत्त्वाची घोषणा
मुंबई: शिवसेना आणि भाजप यांची युती कधी घोषित होईल हे आद्यप गुलदस्त्यात आहे. पण तत्पूर्वी राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांची बैठक उद्या दिनांक २८ सप्टेंबर रोजी बोलावली आहे.
उद्या सकाळी ११ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शिवसेना भवन येथे झालेल्या मुलाखतींमधील इच्छुक उमेदवार यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आले आहे.
