Ramesh Bhatkar Justdial 2
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. मुंबईच्या एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
रमेश भाटकर ह्यांचं स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झालं. हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी, बंदिनी अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने ठसा उमटवला होता.
त्याचप्रमाणे माहेरची साडी, अष्टविनायक, आपली माणसं, गृहलक्ष्मी अशा सिनेमांमध्ये काम केलं. देणाऱ्याचे हात हजार, अश्रूंची झाली फुले, उघडले स्वर्गाचे दार हि त्यांची प्रसिद्ध नाटके.
