इम्रान खान यांचा गौप्यस्फोट; जिहादींना प्रशिक्षण दिल्याची दिली कबुली
पाकिस्तान: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना एक गौप्यस्फोट केला. ज्यात त्यांनी पाकच्या नापाक कृत्यांची थेट कबुलीच दिली. इम्रान खान यांनी कबूल केलं १९८० मध्ये अफगाणिस्तानात रशिया (तत्कालीन सोव्हिएत संघाच्या) विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानने प्रशिक्षण दिले होते. रशियाच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी ही कबुली दिली.
या मुलाखतीत इम्रान खान अमेरिकेवरही भडकले. ते अमेरिकेवर आरोप करत म्हणाले की शीतयुद्धाच्या त्या काळात रशियाच्या विरोधात पाकिस्तानने अमेरिकेची मदत केली होती. जिहादींना रशियन्सच्या विरोधात लढण्याचेही प्रशिक्षण दिलं होतं. पण हे असूनही अमेरिका पाकिस्तान वर दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप लावत आहे. १०० अब्ज डॉलरचं झालं नुकसान मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की हे विचार करून खूप विचित्र वाटतं की आम्ही या समूहाला साथ देऊन काय पाप केलं आहे. मला वाटतं पाकिस्तानने या सर्वांपासून वेगळं राहायला हवं होतं. कारण अमेरिकेला साथ देऊन आम्ही या समूहांना आता पाकिस्तानच्या विरोधात उभं केलंय. आम्ही या दरम्यान मोठ्या प्रमाणात कुर्बानी दिली. जवळपास आम्ही ७० हजार लोकांचा जीव यादरम्यान गमावला. यासोबत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही शंभर अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान झालं.
