अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेस च्या अंतर्गत राजकारणाला वैतागून अखेर रामराम
मुंबई: मुंबई काँग्रेस मधील पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून अखेर आज मंगळवारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेस ला रामराम केला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मध्ये प्रवेश करत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली.
दरम्यान मे महिन्यात उर्मीलाने तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र लिहीत पक्षांतर्गत तक्रारींचा पाढा वाचला होता. त्यात त्यांनी प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीदरम्यान ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात मदत केली नाही त्यांची तक्रार केली होती. हे गुप्त पत्र माध्यमांपर्यंत पोहोचल्यामुळेही त्या जास्त नाराज झाल्या होत्या. येत्या काळात आपण समाजकारणात सक्रियच राहू अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
