Earthquake Bricks
पालघर जिल्ह्याने पुन्हा अनुभवले भूकंपाचे धक्के
पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी विभागात आज सकाळी ७:१५ वा. भूकंपाचे हलके धक्के बसले. रिश्टर स्केल वर या भूकंपाची ३.३ अशी नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात अशाच प्रकारचे सौम्य धक्के बसत आहेत. पण शुक्रवारी सकाळी बसलेल्या धक्क्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
ह्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने भूगर्भ तज्ञ तसेच एन.डी.आर.एफ. च्या तुकडीलाही पाचारण केलं आहे.
