पहा पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार काय म्हणाले !
मुंबई, दि. १५: राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि इतर दिशानिर्देश विचारात घेऊ, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज सांगितलं. निवडणूक आयोगाचे पथक मुंबई दौऱ्यावर असताना, रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेसने केली होती. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
शरद पवार यांनी ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह बाद करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र ही मागणी मंजूर केली नसल्याचं आयोगाने आज स्पष्ट केलं. त्याचवेळी शरद पवार यांच्या पक्षाने केलेल्या सूचनेनुसार त्यांच्या तुतारी फुंकणारा माणूस या निवडणूक चिन्हात सुधारणा केल्याची माहिती त्यांनी दिली.
Source – AIR
Photo Credit – Maharashtra Police Website
