सज्ञान होऊनही दिवंगत राष्ट्रसंत भैय्यु महाराज यांची कन्या कुहू अद्याप ट्रस्टी झालेली नाही
इंदोर: सज्ञान होऊन नऊ महिने उलटूनही दिवंगत राष्ट्रसंत भैय्यु महाराज यांची मोठी मुलगी कुहू सद्गुरू दत्त भैय्यु महाराजांच्या ट्रस्ट ची ट्रस्टी अद्याप बनू शकलेली नाही. पण कुहू ची समत्ती न मिळणे हे या मागचे मोठे कारण आहे. ट्रस्ट ने कुहू सज्ञान होताच तिला ट्रस्टी बनवण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी प्रस्ताव पाठवून सहमतीही मागवली होती. परंतु भैय्यु महाराजांच्या मृत्यूनंतर एक वर्ष उलटूनही कुहू ने आपली संमती दिलेली नाही.
मध्यप्रदेश मधील इंदोर येथे सूर्योदय परिवारातील सेवकांमध्ये भैय्यु महाराज यांच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या वादा दरम्यान महाराजांची पत्नी डॉ. आयुषी आणि मुलगी कुहू ला ट्रस्टी बनवण्याबाबत आश्रम परिवारातून वेगवेगळी मतं होती. या दरम्यान विरोध व समर्थना दरम्यान दिलीप भांडवलकर यांच्या जागी डॉ. आयुषी यांना ट्रस्टी बनवण्यात आले. पण कुहू सज्ञान नसल्यामुळे तिच्या ट्रस्टी पदाचा प्रस्ताव तेव्हा फेटाळण्यात करण्यात आला होता.
