आमच्या राज्यांची नावं-भाषा यांचे उच्चार नीट करायला शिका; ‘रंगदे बसंती फेम’ सिद्धार्थ याने टोचले ट्रोलर चे कान
नवीन शैक्षणिक धोरणातील मसुद्यातनुसार केंद्र शासन हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विचारात होते. पण याला सर्वात आधी विरोध केला दक्षिणेकडील तामिळनाडू या राज्याने. तमिळनाडूच्या प्रखर विरोधामुळे केंद्र सरकारने अखेर माघार घेतली. पण आता या वादाचा दुसरा अंक सोशल मीडियावर खेळला जातोय.
दक्षिणेकडील राजकारण्यांसोबतच तेथील चित्रपट क्षेत्रातील सलेब्रिटींनीही या धोरणाला कडाडून विरोध केला. ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ यानेही या वादात उडी मारली आहे. मयूर पुरी नामक एका ट्रोलर शी या विषयावर वाद चालू असताना तो म्हणाला की तामिळ माणसाने हिंदी शिकणं आणि हिंदी भाषेची सक्ती करणं, त्याची परीक्षा द्यायला लावणं यात फार मोठा फरक आहे. मी ५ भाषा बोलतो आणि १० भाषा मला समजतात. मला त्या भाषा शिकण्याची कधीच जबरदस्ती केली गेली नाही.
https://twitter.com/Actor_Siddharth/status/1135912274500046848?s=19
त्यावर मयुरनेही हिंदी भाषा शिकण्यात गैर काय आहे असा सवाल सिद्धार्थ ला केला. मयुर चा मुद्दा खोडून काढताना शेवटी सिद्धार्थ त्याला म्हणाला की तुम्ही संमिश्र भाषा बोलणं बंद करा तसंच आमच्या राज्यांची, नाव-भाषा यांचे उच्चार नीट करायाला शिका. एकूणच सध्या भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण गरमच आहे. विशेषतः दक्षिणेतलं.
