माणिकराव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट, पण चर्चा गुलदस्त्यात
काँग्रेस चे महाराष्ट्रातील मोठे नेते माणिकराव ठाकरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना अप्रत्यक्ष लाभ पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं विरोधात मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडीत मनसे ला घ्यावं ही राष्ट्रवादीची मागणी होती पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदी असलेल्या अशोक चव्हाणांनी ही मागणी धुडकावून लावली. पण आता येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आजची भेट याच संदर्भात असावी या शक्यतेस वाव आहे. या भेटीसंदर्भातील ट्विट माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून केले आहे. कोणा काँग्रेस नेत्याने मनसे अध्यक्षांची उघड भेट घेणे दुर्मिळ घटना आहे. भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत दोन्ही बाजूने कोणतीच माहिती देण्यात आलेली नाहीये. तूर्तास काँग्रेस-राष्ट्रवादी ने विधानसभेच्या ‘परीक्षेची’ तयारी लवकरच सुरु केल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट व चर्चा. @RajThackeray @mnsadhikrut
— Manikrao Thakare (@Manikrao_INC) May 30, 2019
