Bad न्युज: निकालानंतर पेट्रोल-डिझेल चे दर वाढू शकतात
नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेल च्या दरात होणाऱ्या दर कपातीमुळे जास्त आनंदी होऊ नका. निवडणुकीनंतर हाच आनंद दुःखात बदलू शकतो, कारण या बाबत संकेत मिळत आहेत की तेल कंपन्यांनी पेट्रो उत्पादनांतील दरात कपात बाजाराला पाहत नाही तर कोणा दबावात केली आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला इराण व अमेरिकेच्या ताणलेल्या संबंधांमुळेही इंधनाच्या बाजारात अनिश्चितता आहे. दर सतत वर-खाली होत आहेत.
तसं पाहायला गेलं तर तेल कंपन्यांना भारतीय बाजारातील पेट्रोल-डिझेल चे भाव ठरवण्याचा अधिकार मिळाला आहे. आणि ते या स्वातंत्र्याचा वापर करत नित्य या दोन उत्पादनांची किंमत ठरवतात. पण गेल्या तीन वर्षात अशी बरीच उदाहरणं समोर आली आहेत जेव्हा तेलाचे दर ठरवण्याचे आपले अधिकार या कंपन्यांनी म्यानबंद केले विशेषतः निवडणुकीच्या काळात दर कमी करत अप्रत्यक्षपणे चालू सरकारला फायदाच करून दिला आहे.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला इराण व अमेरिकेच्या ताणलेल्या संबंधांमुळेही इंधनाच्या बाजारात अनिश्चितता आहे. दर सतत वर-खाली होत आहेत. त्यामुळे याची परिणती शेवटी पेट्रोल-डिझेल च्या दरवाढीत होऊ शकते.
