बंगाल च्या मुख्यमंत्री मला ‘पीएम’ मनात नाहीत. त्या पाकिस्तानच्या पीएम ला पीएम मानतात : पीएम मोदी
मऊ, उत्तर प्रदेश: २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात पूर्व उत्तर प्रदेश मध्ये भाजपच्या गोटाला अजून मजबूत करण्यासाठी भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी मऊ ला आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की उत्तर प्रदेश मध्ये सपा-बसपा ने जातीच्या आधारावर एक संधीसाधू आघाडी करण्याचा प्रयत्न केला. यांच्या दरम्यान लखनऊ मध्ये एसी खोलीत बसून वर-वर तर करार झाला आहे, पण जमिनीपासून तुटलेले नेते आपल्या कार्यकर्त्यांनाच विसरून गेले. देश या महाभेसळयुक्त पक्षांचे वास्तव पहिल्या दिवसापासून जाणून आहे. पीएम मोदी म्हणाले समस्त देशाला माहित आहे की मोदी हटाव ची घोषणा तर फक्त निमित्त आहे. वास्तविक यांना आपल्या भ्रष्टाचाराचे पाप लपवायचे होते. ही लोकं खिचडी सरकार व्हावे म्हणून खूप आटा-पिटा करत आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की बहनजी(मायावती) नी पश्चिम बंगाल च्या विषयाला घेऊन माझ्यावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगावरही टीकास्त्र सोडले आहे. ममता दीदी तेथे युपी-बिहार च्या लोकांवर निशाणा साधत आहे. मायावती या विषयावर ममता ना काही सांगण्याऐवजी खुर्ची चा खेळ खेळत आहेत. यूपीतल्या सभेनंतर मी बंगाल ला जाणार आहे. बंगाल च्या मुख्यमंत्री मला ‘पीएम’ मनात नाहीत. त्या पाकिस्तानच्या पीएम ला पीएम मानतात. आज मी बंगाल ला जात आहे तर देशाला सांगू इच्छितो की मिदनापूर मध्ये माझी सभा होती. तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ माजवण्यात आला. मला माझं भाषण अर्ध्यातच सोडून जावं लागलं.
पंतप्रधान मोदी व ममता बॅनर्जी यांच्यातला कलगीतुरा हा टिपेला पोहोचला आहे. कोणीच मागे हटायला तयार नाही.
Mau has unwavering faith in the development agenda of NDA. Here is my speech. https://t.co/mBIE3wtOGO
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2019
