माझ्या मुलींना बाहेर खेळायला जायची बंदी राहील; पाकिस्तानच्या माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचे धक्कादायक विधान
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतो. या वेळी तो एका वेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे की तो आपल्या मुलींना बाहेर जाऊन खेळण्याची मान्यता देत नाही. आफ्रिदी ने आपले आत्मचरित्र ‘गेम चेंजर’ मध्ये लिहिलं आहे की तो सामाजिक आणि धार्मिक कारणांमुळे आपल्या चारही मुलींना (अशा, अजवा, असमारा व अक्सा) यांना बाहर जाऊन खेळण्याची अनुमती देत नाही. महिलाशक्ती वाले त्याच्या या निर्णयावर जे पाहिजे ते बोलू शकतात.
‘द एक्सप्रेस ट्रीब्युनल’ ने आफ्रिदी च्या आत्मकथेच्या हवाल्याने सांगितले की त्याच्या मुली खेळात चांगल्या आहेत. परंतु, त्यांना इनडोअर खेळ खेळण्याचीच परवानगी आहे. जो पर्यंत मुली घरात असतील तो पर्यंत माझ्या बाजूने त्यांना सर्व प्रकारचे खेळ खेळण्याची संमती आहे. असेही तो म्हणाला. क्रिकेट हा खेळ माझ्या मुलींसाठी नाहीये. त्या फक्त इनडोअर खेळ खेळू शकतात, पण त्या सार्वजनिकरित्या कोणत्याही खेळा संदर्भातील कार्यक्रमात, स्पर्धेत भाग घेणार नाही आहेत.
आफ्रीदी ची आत्मकथा आधीपासूनच चर्चेत आहे. त्यात काश्मीर विषयावरही त्याने काही टिप्पणी केल्याचे म्हणले जातेय.

