पुढील १२ महिन्यांसाठी सत्य प्रकाश पाठक प्रशासक म्हणून पाहणार कारभार
मुंबई, दि. २४: रिझर्व बँकेने अभ्युदय सहकारी बँकेचा कारभार वर्षभरासाठी प्रशासकांच्या हाती सोपवला आहे. अभ्युदय बँकेच्या व्यवस्थापनातल्या त्रुटींमुळं बँकेने हा निर्णय घेतला असला तरी बँकेच्या व्यवहारांवर कुठलेही निर्बंध नाहीत. त्यामुळं बँकेचं कामकाज प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सुरू राहील, असं रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे.
भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची नेमणूक या बँकेवर प्रशासक म्हणून केली आहे. तसंच त्यांना सहाय्यासाठी सल्लागार समितीचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यात कॉसमॉस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले, स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे आणि सनदी लेखापाल महेंद्र छाजेड यांचा समावेश आहे.
Source – AIR
