संपुर्ण परिघ व्यापणारी नवीन ब्रॅण्ड मोहिम प्रकट करते ग्राहकांना सक्षम करणारे बँकेचे नाविन्यपुर्ण पर्याय
• बँकेच्या ‘बदलाव हमसे है’ तत्त्वज्ञानावर ब्रॅण्ड मोहिमेत जोर देण्यात आला असून बँकिंगचे पर्याय सुचवण्यात महिलांचा पुढाकार
• एल अँड के साची अँड साची ही या ब्रॅंड कॅपेन चे क्रिएटिव्ह एजन्सी म्हणून काम करत आहेत
मुंबई, दि. १७: भारतातील सर्वात मोठी एसएफबी बँक असलेली त्याचबरोबर नाविन्यपुर्ण बँकींग पर्याय आणि ग्राहककेंद्रीत धोरणांसाठी परिचित असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेने (एयू एसएफबी) “सोच बदलो और बँक भी” या रणनिती अंतर्गत बदलाव हमसे है हे ब्रॅण्ड कॅम्पेन अर्थात ब्रॅण्ड मोहिम विस्तारली आहे.
ब्रॅण्ड मोहिमेमध्ये बचत खाती, चालू खाती आणि संपूर्ण बँकिंगसाठी व्हिडिओ बँकिंग या तीन वेगळ्या बँकींग पर्यायांवर विचार करायला लावणारे संदेश समाविष्ट आहेत. निवडीचे स्वातंत्र, तंत्रज्ञानावर आधारित उपायांद्वारे सादर केलेल्या सुविधांआधारे हे तीनही पर्याय ग्राहकांना सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. प्रख्यात एल अॅण्ड के साची अॅण्ड साची ही या मोहिमेची क्रिएटिव्ह एजन्सी आहे.
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कियारा अडवाणीचा एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या ब्रॅण्डशी असलेला सहभाग या जाहिरात मोहिमेत उत्साहाचे रंग भरतो, परंतु त्याचबरोबर तरुणपणाचा आगळावेगळा स्पर्शही देते. आपल्या बँक ग्राहकांच्या विविध गरजा समजून घेत त्यांची पूर्तता करण्याच्या बँकेच्या वचनबद्धतेला तिचे अष्टपैलू व्यक्तिमत्व या मोहिमेतून मूर्त रूप देते. या मोहिमेमध्ये बँकिंगशी संबंधित नानाविध बाबींसाठी पर्याय सादर करणारी एक व्यक्तिरेखा तिच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आर्थिक निर्णय घेण्याची भारतीय महिलांची वाढती ताकदही त्यातून दर्शवत नारीशक्तीच्या आर्थिक सहभागाचा जयघोष करण्यात आलेला आहे.
पारंपारिक बँकिंग नियम अनेकदा ग्राहकांना मर्यादेच्या कक्षेत बंदीस्त करणाऱ्या जगात एयू स्मॉल फायनान्स बँक नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत अनुकरण करत व्यक्ती आणि व्यवसायांशी जुळवून घेणाऱ्या बँकींगची पाठराखण करते. या जाहिरात मोहिमेचा व्यापक संदेश स्पष्ट आहे आणि तो म्हणजे: “तुमच्या सध्याच्या बँकिंग पर्यायांचा पुनर्विचार करण्याची आणि बदलत्या गरजा पूर्ण करणार्या बदलांचा स्वीकार करण्याची हीच ती योग्य वेळ आहे.”
नव्या जाहीरात मोहिमेबद्दल बोलताना एयू स्मॉल फायनान्स बँकेचे कार्यकारी संचालक उत्तम टिब्रेवाल (Tibrewal) म्हणाले, “आमची पूर्वीची ब्रॅण्ड मोहिम ‘बदलाव हमसे है’ ने प्रचंड प्रशंसा मिळवताना एयू एसएफबी ब्रॅण्ड मनामनात रुजविला आहे आणि आता ही नवीन ब्रॅण्ड मोहीम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. एयूने नेहमीच ग्राहकांची कल्पनाशक्ती जाणून घेण्यात आणि त्यांना नेमके जे हवे आहे ते पुरवण्यासाठी यथास्थितीला आव्हान देण्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे. ही नवीन ब्रॅण्ड मोहीम तीच विचारधारा प्रतिबिंबित करते. तसेच आमच्या ग्राहकांच्या वाढणाऱ्या आकांक्षाच्या अनुरूप ती तयार करण्यात आलेली आहे. आर्थिक निर्णय घेताना महिलांच्या भूमिकेत झालेला ठळक बदल ओळखून, आमच्या ब्रॅण्डचे व्यक्तिमत्त्व ग्राहकांना आपलेसे करणाऱ्या कियारा अडवाणी यांच्यासोबत वाटचाल करताना आम्हाला आनंद होत आहे. पारंपारिक बँकिंगच्या पलीकडे पाहण्याची आमची दृष्टी आहे. आम्ही बँकींग क्षेत्रात सोयीस्कर, सुलभ, आधुनिक आणि ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत अशा आर्थिक प्रवासाद्वारे परिपूर्ण बँकिंग सेवासुविधा प्रदान करण्यासाठी या क्षेत्रात आलेलो आहोत. आमचा संदेश हाच आहे की, प्रत्येक व्यक्तीला बँकिंगद्वारे सक्षम बनवायचे आहे जे पूर्वी कधीही होत नव्हते. ‘सोच बदलो, और बँक भी’ मोहीम बँकिंगला पुन्हा नवी परिभाषा प्रदान करणारा बदल साजरा करते.”
एल अॅण्ड के साची अॅण्ड साची अॅण्ड पब्लिसीस वर्ल्डवाईड इंडियाचे सीईओ परितोष श्रीवास्तव या मोहिमेबद्दल टिप्पणी करताना म्हणाले, “एयू स्मॉल फायनान्स बँकेने गेल्या सहा वर्षांमध्ये एक अविश्वसनीय प्रवास केलेला आहे आणि लाखो ग्राहकांचा विश्वाससुध्दा संपादन केलेला आहे. ही देशातील सर्वात मोठी एसएफबी बँक आहे. बँकिंग उद्योगातील बदलाचे प्रतिनिधी असण्याचे आमचे तत्वज्ञान आमच्या यशाच्या केंद्रस्थानी आहे. ‘बदलाव हमसे है’ ही मोहीम याच तत्त्वज्ञानावर आधारित आहे आणि एयू बँकेच्या नानाविध बँकींग पर्यांयाच्या उत्कृष्ट गुणवत्तेवर प्रकाशझोत टाकते, जे ग्राहकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन तयार केलेले आहेत. ही मोहिम ग्राहकांना त्यांच्या बँकिंग निवडीबद्दल प्रश्न विचारण्यास उद्युक्त करते. एयू एसएफबी ही आधीपासूनच एक प्रतिष्ठीत बँक आहे. आता, आम्हाला एक शक्तिशाली ब्रॅण्ड तयार करायचा आहे जो कोट्यवधी भारतीयांना आनंदरुपी अनुनाद देईल आणि त्यांच्या बँकिंग अनुभवात बदल घडवून आणेल.”
बचत खात्यावर वार्षिक ७.२५ टक्क्यांपर्यंतच्या स्पर्धात्मक व्याजदरांसह मासिक देय व्याजाची सुविधा, विविध वैशिष्ट्याचा समावेश असलेल्या चालू खात्यासह संपूर्ण बिझनेस बँकिंग सेवांचा पर्याय तसेच बँक शाखेत आल्यासारखा अनुभव ग्राहकांना देण्यासाठी २४ बाय ७ व्हिडिओ बँकिंग सेवेसह अत्याधुनिक एयू 0101 डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म यावर ही ब्रॅण्ड मोहिम प्रकाशझोत टाकते. तसेच देशभरातील वैविध्यपूर्ण प्रेक्षकांशी सतत संवाद साधण्यासाठी धोरणात्मकरीत्या तयार करण्यात आलेली आहे.
देशभरातील लाखो प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी हे कॅम्पेन टीव्ही, प्रिंट, रेडिओ, ओओएच आणि विविध डिजिटल मंचावर प्रसारित केले जाईल आणि ग्राहकांची पहिली पसंती म्हणून एयू एसएफबीचे स्थान मजबूत करेल.
Campaign Link – https://www.youtube.com/watch?v=RuNFXVRb7CI&list=PLmuZRT-bI-hO1nKLWxyE9uJkkKDO4DrT3&index=1.
