“हिंदुस्थानच्या कायद्याला, संविधानाला शिवसनेचा पोपट समजू शकत नाही” : ओवेसी यांची शिवसेनेवर खोचक टीका
शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आज श्रीलंकेच्या धर्तीवर बुरखा व नकाब बंदी ची मागणी केली आहे. यावर आता देशभरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
शिवसेनेची बुरखा बंदीची मागणी ही आक्षेपार्ह असून शिवसेनेचे मुखपत्र पोपट मास्टर असून ती हिंदुस्थानचं संविधान समजू शकत नाही. याच बरोबर सुप्रीम कोर्ट व संविधानाचा हवाला देत ते पुढे म्हणाले की देशात ज्याला जे वाटतं ते तो परिधान करू शकतो. अगदी विवस्त्र राहायचे असेल तरीही तो ज्याचा त्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला निवड स्वातंत्र्य आहे. पुढे त्यांनी निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या या अग्रलेखाची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ओवेसी यांच्या या टिकेला शिवसेना काय प्रत्युत्तर देते हे पाहणे लक्षणीय ठरेल.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=628724817599131&id=210058522394900&fs=0&focus_composer=0
