पिंपरी-चिंचवड येथील हाजी शौकत तांबोळी यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
पुणे, दि. ३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने हाजी शौकत तांबोळी यांची पक्षाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याच सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शहर खजिनदार ऍड. संतोष शिंदे, राहुल पवार, सागर तापकीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी- चिंचवड शहर अध्यक्ष इम्रान शेख व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव के. डी. वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
