२०२३ वर्षासाठीचा देशाचा विकास दर ६.७ दशांश टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा मूडीजचा अंदाज
मुंबई, दि. ३: भारताच्या अर्थव्यवस्थेचा २०२३ वर्षासाठीचा विकास दर ६.७ टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा अंदाज अर्थव्यवस्थेचं मूल्यांकन करणारी जागतिक मानांकन संस्था मूडीजने वर्तवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर ७.८ टक्के होता. सेवा क्षेत्रामध्ये झालेला ठोस आणि भांडवली खर्चामुळे पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या विकास दरात वाढ झाल्याची माहिती मूडीजनं दिली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याचं मूडीजनं म्हटलं आहे.
