जागतिक परिस्थिती प्रतिकूल असूनही जुलै २०२३ मध्ये भारताच्या एकूण निर्यात अंदाजे ५९.४३ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंतचा टप्पा
नवी दिल्ली/मुंबई, दि. १४: देशाची एकूण व्यापार तूट जुलै 2022 मधील 15.24 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 45.22% ने सुधारून जुलै 2023 मध्ये 8.35 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी झाली आहे. मालाची व्यापार तूट जुलै 2022 मधील 25.44 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत 18.74% ने सुधारून जुलै 2023 मध्ये 20.67 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली आहे. जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये लोह खनिजाच्या निर्यातीत 962.82% ची लक्षणीय वाढ नोंदवली गेली आणि एप्रिल-जुलै 2022 च्या तुलनेत यात एप्रिल-जुलै 2023 दरम्यान 64.52% ची वाढ झाली आहे.
मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत जुलै 2023 आणि एप्रिल-जुलै 2023 मध्ये अनुक्रमे 13.09% आणि 37.6% ची वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सिरॅमिक उत्पादने आणि काचेच्या वस्तूंच्या निर्यातीत जुलै 2023 आणि एप्रिल-जुलै 2023 मध्ये अनुक्रमे 20.82% आणि 12.39% वाढ नोंदवण्यात आली आहे.
कृषी निर्यातीत दमदार वाढ झाली आहे. जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये फळे आणि भाज्यांची निर्यात 18.94%, तेल बियाणे 32.83%, खाद्यतेल 34.24%, तांदूळ निर्यात 5.38% ने वाढली आहे
